10 रुपयाची प्रिंटआऊट आणि बरंच काही...; पुणेकरांनाही मागे टाकतील अशा मुंबईकरांच्या Online Order, पाहूनच चक्रावून जाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Online Shopping Order Record : मुंबईकरांचा 2025 सालातील ऑनलाईन शॉपिंगचा रिपोर्ट एका ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने जारी केला आहे. जो आश्चर्यकारक आहे.
ऑनलाईन शॉपिंगमुळे घरबसल्या अगदी काही दिवसात किंवा काही वेळात सामान आपल्या घरी पोहोचतं. खाण्यापिण्याचे पदार्थ तर काही मिनिटांत आपल्या घर येतात. या ऑनलाईन शॉपिंगची लोकांना आता इतकी सवय झाली आहे की अगदी साधी 10 रुपयांची प्रिंटआऊटही लोक ऑनलाईन मागवत आहेत. प्रिंटआऊट काढण्यासाठीही लोक बाहेर पडत नाही आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही 24 तास धावणाऱ्या मुंबईतील ऑनलाईन शॉपिंगचा हा धक्कादायक रिपोर्ट आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पाव, कित्येक मुंबईकरांच्या घरातील सकाळचा नाश्ता आहे. एका वर्षात संपूर्ण मुंबईत 734508 पॅकेट्स पाव ऑर्डर करण्यात आले. आंबा हे सिझनल फळ आणि मोदक हा असा पदार्थ जो खासकरून गणेशोत्सवात प्रत्येक घरात बनतो. पवईमध्ये या वर्षात 17112 आंबे ऑनलाईन ऑर्डर करण्यात आले. या यादीत जोगेश्वरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गणेश विसर्जनादिवशी दादरमधील एका व्यक्तीने 1750 मोदकांची ऑर्डर दिली.
advertisement
advertisement









