TRENDING:

Pune Ganeshotsav 2025 : पुण्यातील गणेशोत्सवात दर्शनासोबत करा स्ट्रीट फूड सफर; मिसळपासून वडा पावपर्यंत चविष्ट पदार्थांची मेजवानी

Last Updated:

Famous Foods In Pune : पुण्यातील गणेशोत्सव म्हटलं की फक्त गणपती बाप्पाचे दर्शन आणि भव्य मंडप नव्हे तर स्ट्रीट फूडची मजाही तितकीच खास असते. मंडळांच्या रांगेतून फिरताना भूक लागली तर या झणझणीत पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच हवा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे हे शहर संस्कृती, परंपरा आणि खाद्यपदार्थ यांचं उत्तम मिश्रण आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पुणे उत्साहाने उजळून निघतं. श्रीमानगणपतीपासून कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरीपासून केसरीवाड्यापर्यंत असंख्य मानाचे गणपती पाहायला हजारो भक्त पुण्यात येतात. दर्शनाबरोबरच पुण्यातील खाद्यसंस्कृती अनुभवायची संधीही या काळात मिळते. जर तुम्ही पुण्यात गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला येत असाल, तर येथे मिळणारे काही खास पदार्थ नक्कीच चाखायला हवेत.
News18
News18
advertisement

1. मिसळपाव : पुण्याची मिसळपाव म्हणजे अगदी जीव की प्राण. सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा दर्शनानंतरची भूक भागवण्यासाठी, मिसळ हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. तिखट-पातळ रस्सा, वर टाकलेले चिवडा, फरसाण, कांदा आणि लिंबाचा रस – यामुळे मिसळपावाची चव एकदम वेगळी लागते. कसबा गणपती दर्शनानंतर पुण्यातील प्रसिद्ध बेडेकर मिसळ किंवा काटा किर्र मिसळ चाखायलाच हवी.

advertisement

2. वडा-पाव : मुंबईचा वडा-पाव जितका लोकप्रिय आहे, तितकाच पुण्यातील वडा-पावही लोकांना वेड लावतो. बाहेरून खरपूस आणि आतून गरमागरम बटाट्याचा वडा, सोबत तिखट-गोड चटणी आणि हिरवी मिरची. एवढं साधं असलं तरी पोटभरीचं जेवण बनतं. शनिवारवाडा किंवा लक्ष्मीरोडवर दर्शन संपवून निघालात, तर रस्त्यावरच्या वडा-पावच्या गाड्या तुमचं लक्ष नक्की वेधून घेतील.

3. मस्तानी : पुण्यात गणेशोत्सव म्हणजे मिरवणुकीचा जल्लोष, पण त्याचबरोबर मस्तानीशिवाय पुण्याचा अनुभव अपुरा राहतो. दाटसर मिल्कशेकवर टॉपिंग म्हणून सुकामेवा, फळे आणि आईस्क्रीम घातलेलं मस्तानी हे पुण्यातलं खास पेय आहे. सुजाता मस्तानी आणि बाबू मस्तानी या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मस्तानी मिळते. दर्शनानंतर गोडसर, थंडगार मस्तानी प्यायली की थकवा दूर होतो.

advertisement

4. भेळपुरी आणि रगडा-पटिस : गणेशोत्सवात पुण्यातील रस्त्यावरच्या खाऊगल्ल्या चैतन्याने गजबजलेल्या असतात. फरसाण, कांदा, बटाटा, चटणी यांचा उत्तम संगम म्हणजे भेळपुरी. तर रगडा-पटिस हा थोडा झणझणीत, चविष्ट आणि तृप्त करणारा पदार्थ आहे. शनिवारवाडा, लक्ष्मीरोड, किंवा अण्णा पवार खाऊगल्लीत भेळ-रगड्याचे स्टॉल्स कायम गजबजलेले दिसतात.

5. महाराष्ट्रीयन थाळी : पुण्यात गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी जरूर चाखावी. पुरणपोळी, भाजी, आमटी, वरण-भात, पापड, लोणचं अशा अनेक पदार्थांनी सजलेली थाळी भूक भागवतेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळखही करून देते. श्यामसुंदर, आलनकर किंवा श्रीदत्त भोजनालय ही ठिकाणं खास थाळीसाठी प्रसिद्ध आहेत.

advertisement

6. बाकरवडी : पुण्यातील चितळे बंधूंची बाकरवडी ही जगप्रसिद्ध आहे. कुरकुरीत, मसालेदार आणि गोडसर अशी ही स्नॅक आयटम दर्शनाला आलेल्या भाविकांनी नक्कीच चाखावी. फक्त चाखायचीच नाही तर घरी जाताना बाकरवडीचे पॅकेट घेऊन जाणं ही अनेकांची परंपरा झाली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganeshotsav 2025 : पुण्यातील गणेशोत्सवात दर्शनासोबत करा स्ट्रीट फूड सफर; मिसळपासून वडा पावपर्यंत चविष्ट पदार्थांची मेजवानी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल