डिजिटल कुलूप उघडलं...
ही घटना मागील शनिवारी (11 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. येथील 33 वर्षीय तक्रारदार कुटुंबासह सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी 3 वाजता ते घरी परतले असता, दरवाज्याचे डिजिटल कुलूप उघडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घरात तपासणी केली. तेव्हा घरी चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
advertisement
सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले
तपासणीदरम्यान, शयनगृहातील पलंगामध्ये ठेवलेले 26 लाख 67 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे घाबरलेल्या तक्रारदारांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या उपनिरीक्षक हसन मुलाणी या चोरीच्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. CCTV मध्ये माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जातोय.
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ
दरम्यान, पुणे-नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात पहाटेच वाहनचोरांनी धाडस चोरी करत गावातील सरपंचाची आलिशान टोयोटा फॉर्च्युनर (MH 12 TH 9955) पळवून नेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण चोरीची घटना जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. ही घटना कोरेगाव भीमा-पुणे नगर रोडवरील यशराज टॉवर परिसरात गुरुवारी 16 तारखेला पहाटेच्या पहाटेच्या सुमारास घडली होती.