TRENDING:

Pune Crime : पती झाला हैवान! हडपसरमध्ये दोरीने आवळला पत्नीचा गळा, मग लोखंडी गजाने फोडलं डोकं

Last Updated:

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या अनिलने जया यांचा दोरीने गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : कौटुंबिक वादाचे रुपांतर एका भीषण हिंसक घटनेत झाले आहे. हडपसरमधील महंमदवाडी परिसरात एका पतीने आपल्या पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पत्नीने यापूर्वी पोलिसांत तक्रार केल्याचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीवर हल्ला (AI Image)
पत्नीवर हल्ला (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

जया माने (वय ३५, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी) यांनी याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पती अनिल पंढरीनाथ माने (वय ४२) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माने पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती कारणावरून खटके उडत होते. सततच्या छळाला कंटाळून जया यांनी यापूर्वी पोलिसांकडे धाव घेऊन पतीविरुद्ध दाद मागितली होती.

advertisement

सोमवारी (२२ डिसेंबर) या वादाने उग्र रूप धारण केले. "तू माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का दिलीस?" असा जाब विचारत अनिलने जया यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या अनिलने जया यांचा दोरीने गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता त्याने जवळच असलेला लोखंडी गज उचलून त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात जया गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चिकन, मटणपेक्षा महाग झाली ही भाजी, प्रोटीनच्या बाबतीत मासेही काहीच नाही!
सर्व पहा

भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे महंमदवाडी परिसरात दहशतीचे वातावरण आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तक्रार केल्यानंतरही महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पती झाला हैवान! हडपसरमध्ये दोरीने आवळला पत्नीचा गळा, मग लोखंडी गजाने फोडलं डोकं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल