TRENDING:

पतीला बेदम मारहाण, पत्नीचं दिवसाढवळ्या अपहरण, पुण्याच्या खेडमधील धक्कादायक प्रकार

Last Updated:

Pune Crime News: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात एका तरुणाला १५ ते २०जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केली आहे. तसेच आरोपींनी पीडित तरुणाच्या पत्नीचं दिवसाढवळ्या अपहरण केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Crime News: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका तरुणाला १५ ते २०जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित तरुणाच्या पत्नीचं दिवसाढवळ्या अपहरण केलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आरोपी टोळकं एका तरुणीचं अपहरण करून तिला घेऊन जाताना दिसत आहेत.
News18
News18
advertisement

विश्वनाथ बबन गोसावी असं मारहाण झालेल्या ३९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात विवाहितेच्या दोन भावांसह आई आणि इतर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरजातीय प्रेमविवाहाच्या कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय जखमी तरुण विश्वनाथ गोसावी याचं प्राजक्ता नावाच्या एका २८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी इथं वैदिक पद्धतीने विवाह केला होता. पण हे लग्न मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हतं. याच कारणातून ३ ऑगस्ट रोजी विश्वनाथ यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांमध्ये मुलीच्या दोन भावांसह आई आणि इतर १५ जणांचा समावेश आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

पतीला मारहाण करून पत्नीचं अपहरण करतानाचा सर्व प्रकार एका स्थानिकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. ज्यात आरोपी विवाहितेला बळजबरीने घेऊन जाताना दिसत आहेत. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पतीला बेदम मारहाण, पत्नीचं दिवसाढवळ्या अपहरण, पुण्याच्या खेडमधील धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल