पुणे : लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेल्या सुनेला छळ करून तिचे हाल करून मृत्यू कवटाळण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडीमधील दीप्ती मगर चौधरीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आले आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्य हादरलं असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याप्रकरणी पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, सासरच्या जाचाला कंटाळून दिप्तीने शनिवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नामध्ये दिप्तीला 50 तोळे सोने
आत्महत्या केलेल्या दिप्तीचा सात वर्षापूर्वी धुमधडाक्यात शाही विवाह पार पडला होता. दिप्तीची सासू सरपंच तर सासरे शिक्षक होते. सरपंच घरात मुलगी नांदायला जाणार असल्याने आई- वडिलांनी देखील सासरच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. लग्नामध्ये दिप्तीला 50 तोळे सोने देण्यात आले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी दिप्तीचा वेगवेगळ्या कारणांवरून छळ करण्यास सुरुवात केली.
लग्नानंतर सासरी 35 लाख दिले
लग्नाच्या काही महिन्यानंतर सासरची दिप्तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घालून पाडत बोलण्यास सुरुवात केली. तू दिसायला सुंदर नाही, तुला घरातली काम येत नाहीत असे म्हणत तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आला. सासरच्या जाचाविषयी दिप्तीने वारंवार माहेरी तक्रार केली मात्र लेकीचा संसार नेटाने व्हावा, यासाठी कायम तिची समजूत घालत माहेरच्यांनी सासरच्या मंडळींच्या अपेक्षा पूर्ण केल्या . मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश ,गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र तरीही त्रास संपला नाही अखेर दिप्तीने काल रात्री गळफास लावत आत्महत्या केली.
सासू सरपंच असलेल्या घरात सुनेचा छळ
आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत. पुण्यात सासरच्या मंडळीच्या छळापायी काहीच दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे या विवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली होती. वैष्णवीसोबत ज्याप्रकारचा छळ आणि मानसिक जाच करण्यात आला त्याने संपूर्ण महाराष्ट्र संतापला होता. त्यानंतर आता पुण्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून दिप्तीने आपला जीव दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत
