TRENDING:

तिला लग्न करायचं होतं, पण त्याने 'गेम' केला; पुण्यातील महिलेसोबत मॅट्रिमोनियल साईटवर भयंकर घडलं, पोलिसात धाव

Last Updated:

तक्रारदार महिला वडगावशेरी परिसरात राहते. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने एका प्रसिद्ध मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर (Matrimony Site) जोडीदार शोधणे एका महिलेसाठी अत्यंत महागडे ठरले आहे. लग्नाचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका ४४ वर्षीय महिलेची तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
महिलेसोबत मॅट्रिमोनियल साईटवर भयंकर घडलं (AI Image)
महिलेसोबत मॅट्रिमोनियल साईटवर भयंकर घडलं (AI Image)
advertisement

असा रचला कट

तक्रारदार महिला वडगावशेरी परिसरात राहते. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने एका प्रसिद्ध मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली होती. तिथे ओळख झालेल्या एका व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. एकदा विश्वास निर्माण झाल्यावर चोरट्यांनी महिलेला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली.

दीड वर्षात ६० लाखांचा गंडा

advertisement

भामट्याने कधी वैयक्तिक अडचण, तर कधी गुंतवणुकीचे कारण सांगून महिलेकडे पैशांची मागणी केली. लग्नानंतर आपण सोबतच राहणार आहोत, या भाबड्या आशेपोटी महिलेने कोणतीही खातरजमा न करता गेल्या दीड वर्षात टप्प्याटप्प्याने तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले.

धमकी आणि मोबाइल बंद

जेव्हा महिलेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पैशांची मागणी केली असता, तिला चक्क जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांचे सर्व मोबाईल क्रमांक बंद करून पळ काढला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

अखेर पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत ८ जणांविरोधात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे ऑनलाइन जोडीदार शोधताना किती सतर्क राहावे, याचा अनुभव पुन्हा एकदा समोर आला आहे.

मराठी बातम्या/पुणे/
तिला लग्न करायचं होतं, पण त्याने 'गेम' केला; पुण्यातील महिलेसोबत मॅट्रिमोनियल साईटवर भयंकर घडलं, पोलिसात धाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल