मेट्रो धावण्यास सज्ज
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या सहकार्याने पीएमआरडीए हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या मार्गावरील २३ स्थानकांपैकी १५ ते १७ स्थानकांचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, १३ स्थानके पूर्णपणे तयार झाली आहेत. संपूर्ण मार्गावर सध्या मेट्रोच्या चाचणी फेऱ्या (Trial Runs) वेगाने सुरू आहेत.
एप्रिलमध्ये सेवेचा मुहूर्त?
advertisement
मेट्रोचे कामकाज एप्रिल २०२६ च्या डेडलाईननुसार पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र, अधिकृत सेवा सुरू करण्यापूर्वी कन्सेशनरकडून अंतिम मंजुरी पत्र मिळणे बाकी आहे. हे पत्र मिळाल्यावरच पूर्ण मार्ग सुरू करायचा की काही स्थानकांपुरती अंशत: सेवा सुरू करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. हिंजवडीतील आयटी प्रोफेशनल्स आणि शिवाजीनगर परिसरातील हजारो चाकरमान्यांसाठी ही मेट्रो वरदान ठरणार आहे.
ही मेट्रो शिवाजीनगर येथे पुणे मेट्रोच्या विद्यमान नेटवर्कला जोडली जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अधिक सोयीचे होईल. तांत्रिक आणि सुरक्षाविषयक सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर लवकरच पुणेकरांच्या सेवेत ही 'लाईफलाईन' दाखल होईल, अशी चिन्हे आहेत.
