TRENDING:

ते दोघं मित्र-मैत्रीण दुचाकीवर निघालेले; पण रस्त्यातच तिच्या डोळ्यादेखत नितीनला मृत्यूनं गाठलं, पुण्यात भयंकर घडलं

Last Updated:

नितीन आणि त्याची मैत्रीण हे दोघेही महाविद्यालयात शिक्षण घेत होते. गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ते दोघे दुचाकीवरून नवले पुलाकडून कात्रजच्या दिशेने निघाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे:पुण्यातील नवले पूल परिसर हा अपघातांचे केंद्र बनला असून, या ठिकाणी पुन्हा एकदा एका तरुणाला प्राणाला मुकावे लागले आहे. गुरुवारी (१२ फेब्रुवारी) रात्री दुचाकीवरून निघालेल्या महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणीला एका भरधाव आराम बसने चिरडले. या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे.
पुण्यात भीषण अपघात (AI Image)
पुण्यात भीषण अपघात (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

नितीन जुनवणे (वय १९, रा. धायरी फाटा) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन आणि त्याची मैत्रीण हे दोघेही महाविद्यालयात शिक्षण घेत होते. गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ते दोघे दुचाकीवरून नवले पुलाकडून कात्रजच्या दिशेने निघाले होते. यावेळी मागून येणाऱ्या एका खासगी आराम बसने त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.

advertisement

ही धडक इतकी भीषण होती की, नितीन रस्त्यावर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या अपघातात त्याची मैत्रीणही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आपल्या डोळ्यादेखत मित्राचा झालेला शेवट पाहून तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

advertisement

बसचालक पसार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आर्थिक स्थैर्य मिळणार,व्यवसायात नवीन संधी,महाशिवरात्रीला या 4 राशींवर कृपादृष्टी
सर्व पहा

अपघातानंतर बसचालक भीतीपोटी घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी जखमी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
ते दोघं मित्र-मैत्रीण दुचाकीवर निघालेले; पण रस्त्यातच तिच्या डोळ्यादेखत नितीनला मृत्यूनं गाठलं, पुण्यात भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल