पुण्यात 40 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी लढणार आहे. तर पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेचे आणि मनसेची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिेंदेची युती न झाल्याने पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.
advertisement
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी (Pune NCP Candidate List)
| प्रभाग क्र. | उमेदवारांची नावे |
| 1 | आरती चव्हाण, नूतन प्रताप, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे |
| 2 | नंदिनी धेंडे, हर्षल टिंगरे, शीतल सावंत, सुहास टिंगरे |
| 3 | बंडू खांदवे, सुनील खांदवे, उज्ज्वला खांदवे, उपा कडमकर |
| 4 | वसुंधरा डबाळे, समीर भाडले, दर्शना पठारे, नानासाहेब आबनावे |
| 5 | सचिन भगत, संदीप जराड, सुनीता गलांडे, प्रकाश गलांडे |
| 6 | अजित गव्हाणे, संध्या देवकर, ज्योती चांदवढळ, अनवर पठाण |
| 23 | अनिकेत कोठावळे, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शाहबाज खान |
| 25 | रूपाली पाटील-ठोंबरे, राधिका कुलकर्णी, सुनील खाटपे |
| 26 | गणेश कल्याणकर, रूपाली पाटील-ठोंबरे, सीमा काची, विजय ढेरे |
| 27 | धनंजय जाधव, दीपाली बारवकर, हर्षदा लांडगे, अशोक हरणावळ |
| 28 | आशा तापकीर, प्रिया गदादे, सूरज लोखंडे, तुकाराम पवार |
| 38 | स्मिता कोंढरे, दत्तात्रय धनकवडे, सीमा बेलदरे, सारिका फाटे, प्रकाश कदम |
| 39 | प्रतीक कदम, अभिलाषा घाटे, कुमार नायर |
| 40 | सपना धर्मवत, गंगाधर बधे |
पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 125 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40
पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 125 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सोडविण्यात आला. चिन्हाचा प्रश्नही सुटला आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र निवडणूक लढणार होते, मात्र दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप व चिन्हाच्या कारणावरून प्रारंभ बोलणी बिनसली. रविवारी रात्रीनंतर मात्र दोन्ही राष्ट्रवादीमधील अंतर्गत घडामोडींना कमालीचा वेग येऊन अखेर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यानंतर वेळ न दवडता दोन्हीकडील नेत्यांनी जागा वाटपाच्या चर्चेस सुरुवात केली.
