आदित्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
सराव करत असताना स्विमिंग टँकमध्ये (Swimming Tank) आदित्य यादव अचानक बेशुद्ध झाला आणि त्याची हालचाल थांबली. त्यावेळी उपस्थित असलेल्या लाईफगार्ड्सनी (Lifeguards) त्याला लगेच बाहेर काढून त्याला 'सीपीआर' दिला, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना आणि विद्यार्थ्याच्या वरिष्ठांना कळवण्यात आले आहे, असून पुढील चौकशी सुरू आहे. आदित्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? आणि तो अचानक बेशुद्ध कसा पडला, याबाबत सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
रँगिग झाल्याचा आरोप
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. 18 वर्षाचा अंतरीक्ष चार महिन्यांपूर्वी पुण्यातील एनडीएमध्ये आला होता. अंतरिक्षने गेल्या आठवड्यात शुक्रवारी पहाटे आपल्या खोलीमध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं होतं. त्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी त्याच्यावर रँगिग झाल्याचा आरोप केला होता. अंतरिक्षला गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ कॅडेट्सकडून त्रास दिला जात होता. आम्ही ही बाब अकादमीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असं त्याच्या पालकांनी म्हटलं होतं.
तीन प्रमुख शाखांसाठी प्रशिक्षण
दरम्यान, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ज्याला NDA म्हणूनही ओळखले जाते, ही भारतीय सशस्त्र सेवांसाठी एक अकादमी आहे जी खडकवासला, पुणे येथे आहे. पुणे दौऱ्याचा भाग म्हणून इतिहासप्रेमींसाठी ही एक सर्वोत्तम ठिकाण आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी संयुक्त सेवा अकादमी म्हणून काम करते जिथे कॅडेट्सना सशस्त्र दलांच्या तीन प्रमुख शाखांसाठी प्रशिक्षण दिले जाते. NDA मध्ये त्यांचा वेळ घालवल्यानंतर, कॅडेट्स त्यांच्या संबंधित सेवा अकादमींमध्ये प्री-कमिशनिंग प्रशिक्षणासाठी पुढे जातात.
