नेमकी घटना काय?
सोमवार पेठेतील एका सोसायटीत राहणाऱ्या महिला मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आपल्या फ्लॅटला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. भरवस्तीत घर असल्याने आणि वर्दळ असल्याने त्यांना चोरीची शंकाही आली नाही. मात्र, दुपारी पाऊणे तीन वाजता त्या घरी परतल्या असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.
पुणे हादरलं! सोन्याच्या दागिन्यांसाठीचा 'तो' हट्ट पडला महागात; पतीनं पत्नीला कायमचं संपवलं
advertisement
लाखोंचा ऐवज लंपास: घरात प्रवेश केल्यावर चोरट्यांनी कपाट फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी अवघ्या साडेतीन तासांच्या कालावधीत लंपास केला होता. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने तात्काळ समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी सुरू केली आहे. गजबजलेल्या भागात आणि ते ही दिवसा झालेल्या या घरफोडीमुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
दुचाकीवरील तरुणाला लुटलं
पुणे शहरातील फुरसुंगी भागातही चेन स्नॅचिंगची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून, चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील १ लाख २२ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
