TRENDING:

ऑनलाईन ॲपवरून शोधली कामवाली; आधी चांगलं काम करून मालकीणीचं मन जिंकलं, मग घरातच हादरवणारं कांड

Last Updated:

सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवण्याच्या सवयीमुळे एका महिलेनं एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरकामासाठी महिला शोधली होती. सुरुवातीला काही महिने या कामगार महिलेनं अतिशय चांगल्या प्रकारे काम करून घरमालकीणचा विश्वास जिंकला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : आजकाल शहरात राहणारे अनेकजण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन बुक करताना दिसतात. हा पर्याय सोपा आणि सहज उपलब्ध होणारा आहे. मात्र, हेच करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. पुणे शहरात मोबाईल ॲपवरून घरकामगार (मोलकरीण) शोधणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. काही महिने विश्वास संपादन केल्यानंतर, संबंधित कामगार महिलेनं घरातील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ॲपवरून घेतलेल्या या कामवालीमुळे आता संबंधित महिला कायदेशीर आणि कौटुंबिक पेचात अडकली आहे.
मोलकरणीनं केली चोरी (AI Image)
मोलकरणीनं केली चोरी (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवण्याच्या सवयीमुळे एका महिलेनं एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरकामासाठी महिला शोधली होती. सुरुवातीला काही महिने या कामगार महिलेनं अतिशय चांगल्या प्रकारे काम करून घरमालकीणचा विश्वास जिंकला. मात्र, एके दिवशी संधी मिळताच तिने घरातील मौल्यवान दागिने चोरले आणि पसार झाली. ही घटना घरी सांगणं कठीण झाल्यानं आणि चोरीला गेलेला ऐवज मोठा असल्यानं तक्रारदार महिलेची मोठी गोची झाली आहे.

advertisement

महिलेनं मदतीसाठी 'राष्ट्रीय मजदूर संघा'चे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, ज्या ॲपवरून मोलकरीण नेमली होती, त्याचं नावही संबंधित महिला विसरली आहे. शिवाय, अशा ॲप्सकडे कामगारांची पुरेशी पडताळणी नसल्याने चोरट्या महिलेचा शोध घेणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंती! बाप्पाची पूजा कशी करावी? काय आहेत नियम? Video
सर्व पहा

या घटनेवरून घरकामगार संघटनांनी सरकार आणि ॲप चालकांवर निशाणा साधला आहे. "अनेक ॲप चालक कामगार कायद्यांचे पालन करत नाहीत. सरकारने त्यांना कायद्याच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे," अशी मागणी जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी केली आहे. सध्या पोलिसांनी नागरिकांना ॲपवरून कोणालाही कामावर ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती आणि पोलीस पडताळणी केल्याशिवाय घेऊ नये, असे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
ऑनलाईन ॲपवरून शोधली कामवाली; आधी चांगलं काम करून मालकीणीचं मन जिंकलं, मग घरातच हादरवणारं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल