लॉजमध्ये उघडकीस आला प्रकार: पीयूष हा गेल्या आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी पुण्यातील कॅम्प परिसरातील 'मुकेश लॉज' येथील एका खोलीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
advertisement
दोन दिवसांपूर्वीच आत्महत्येचा अंदाज: बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, पीयूषचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची अवस्था आणि येणारी दुर्गंधी पाहून, त्याने दोन ते तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला.
पीयूषने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वाई पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली असून, अधिक तपास केला जात आहे.
