51 वर्षाच्या महिलेचं पोट अचानक मोठं दिसू लागलं; शस्त्रक्रिया करताच निघालं असं काही की पुण्यातील डॉक्टरही थक्क

Last Updated:

संबंधित महिलेला गेल्या दोन महिन्यांपासून मासिक पाळीत अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. यामुळे तिचे हिमोग्लोबिन अवघे ५ ग्रॅम प्रति डेसिलिटरपर्यंत खाली आले होते.

महिलेच्या गर्भाशयातून १८ किलो वजनाची गाठ काढली (AI  Image)
महिलेच्या गर्भाशयातून १८ किलो वजनाची गाठ काढली (AI Image)
पुणे : पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका ५१ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून १८ किलो वजनाची प्रचंड मोठी गाठ यशस्वीपणे बाहेर काढली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि उच्च जोखमीच्या या शस्त्रक्रियेमुळे महिलेला जीवदान मिळाले असून, वैद्यकीय क्षेत्रातील ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे.
संबंधित महिलेला गेल्या दोन महिन्यांपासून मासिक पाळीत अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. यामुळे तिचे हिमोग्लोबिन अवघे ५ ग्रॅम प्रति डेसिलिटरपर्यंत खाली आले होते. तपासणीत तिच्या गर्भाशयात एक अवाढव्य गाठ असल्याचे निदान झाले. महिलेला आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास असल्याने ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते.
अशी पार पडली शस्त्रक्रिया: कर्करोगतज्ज्ञ डॉ. निखिल पर्वते आणि हृदयविकारतज्ज्ञ डॉ. राजेश बदानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेपूर्वी महिलेच्या मूत्रनलिकेत स्टेंट बसवण्यात आला, जेणेकरून इतर अवयवांना इजा होणार नाही. गाठीचा आकार खूप मोठा असूनही डॉक्टरांनी पोटाची खुली शस्त्रक्रिया करून १८ किलोची गाठ बाहेर काढली. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रियेत केवळ १०० मिली रक्तस्राव झाला, त्यामुळे रुग्णाला बाहेरून रक्त देण्याची गरज भासली नाही.
advertisement
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या पाचव्या दिवशी महिलेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दोन आठवड्यांच्या तपासणीनंतर तिची प्रकृती उत्तम असून तिला आता कोणत्याही औषधांची गरज भासत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. "लवकर निदान आणि अचूक नियोजनामुळेच आम्ही आजूबाजूच्या अवयवांना धक्का न लावता ही गाठ काढू शकलो," असे डॉ. पर्वते यांनी नमूद केले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
51 वर्षाच्या महिलेचं पोट अचानक मोठं दिसू लागलं; शस्त्रक्रिया करताच निघालं असं काही की पुण्यातील डॉक्टरही थक्क
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement