TRENDING:

निलेश घायवळला पोलिसांचा आणखी एक दणका, जामखेडचं 'ते' प्रकरण भोवलं

Last Updated:

निलेश घायवळ याचाही या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : नाजर परिसरात वैयक्तिक वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेश घायवळसह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुख्यात गुंड निलेश गायवळ याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
nilesh ghaiwal
nilesh ghaiwal
advertisement

आरपीआयचे नेते सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये सुनील साळवे यांचा मुलगा पत्नी आणि इतर ६ गंभीर जखमी झाले होते, अनुप साळवे हे आपल्या मित्रांसह नाजर येथे गेले असता जुन्या वादातून आरोपींनी त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान आरोपींपैकी काहींनी धारदार हत्याराने हल्ला करून साळवे यांना गंभीर दुखापत केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

advertisement

१२ जणांविरोधात गुन्हा दाखल

जखमी तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी साईनाथ पाटणकर, साईनाथ साळवे, विजय साळवे, अमय भोसले यांच्यासह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबांवरून निलेश घायवळ याचाही या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

advertisement

घायवाळचा पासपोर्ट रद्द

पुण्यातील फरार गुंड निलेश घायवळ याच्याभोवती तपास यंत्रणांनी आपल्या कारवाईचा फास अधिकच घट्ट केला आहे. बँक खाती गोठवून पोलिसांनी घायवळची आर्थिक नाकेबंदी केली. तर, दुसरीकडे पासपोर्ट रद्द करून आणखी एक दणका दिला. मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हेगारी कारवायांमध्ये अडकलेला निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

advertisement

घायवळची आर्थिक नाकेबंदी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, आधी हे वाचा
सर्व पहा

निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 10 बँक खाती पुणे पोलिसांनी गोठवली आहेत. या खात्यांमध्ये 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात समोर आले. निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, ‘पृथ्वीराज एंटरप्रायजेस’ यांच्या खात्यांचा समावेश आहे. या खात्यांवरील व्यवहारांसाठी आता पुणे पोलिसांची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) आवश्यक आहे. त्यामुळे या खात्यातून पैसे काढणे किंवा व्यवहार करणे पूर्णपणे थांबले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
निलेश घायवळला पोलिसांचा आणखी एक दणका, जामखेडचं 'ते' प्रकरण भोवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल