TRENDING:

PMC Election : पुण्यात उबाठाच मोठा भाऊ, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मशालीला झुकतं माप, रेल्वे इंजिन किती जागांवर लढणार?

Last Updated:

Pune PMC Election Seat distribution : पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे पक्षांच्या जागेचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी याविषयी माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Municipal corporation Election : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचं राजकारण तापत असल्याचं पहायला मिळतंय. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती जाहीर झाली असून पुण्यात मोठा भाऊ कोण? अशी चर्चा सुरू असताना मनसे आणि उबाठाचा फॉर्म्युला ठरला आहे. पुण्यात दोन्ही पक्षांच्या जागेचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी याविषयी माहिती दिली.
Pune PMC Election Seat distribution
Pune PMC Election Seat distribution
advertisement

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा दोन्ही पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितच लढणार असल्याचं हेमंत संभूस यांनी जाहीर केलं आहे. तर दोन्ही पक्षाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसात अधिकृत निर्णय येणार आहे. प्राथमिक वाटाघाटीनुसार, पुण्यात शिवसेना ठाकरे गट 91 जागा तर मनसे 74 जागा लढणार आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहे.

advertisement

वसंत मोरे काय म्हणाले होते?

मनसे आणि शिवसेनेचा निर्णय मराठी माणसांसाठी महत्त्वाचा आहे. 2017 मध्ये शिवसेनेने जवळजवळ 130 -135 जागेवर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मला वाटतं की 70 टक्के जागा या शिवसेनेकडे असतील, असं ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे म्हणाले होते. मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने 70 टक्के जागा लढवल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही केली आहे, असंही मोरे म्हणाले होते.

advertisement

सर्व पक्षांमधून इनकमिंग सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसोबत काँग्रेसही एकत्र येईल अशी चर्चा असतानाच काँग्रेसने मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी भाजपला रोखण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. महापालिका निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच भाजपमध्ये सर्व पक्षांमधून इनकमिंग सुरू झाले. त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये या पक्षांना उमेदवार शोधणे कठीण झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
PMC Election : पुण्यात उबाठाच मोठा भाऊ, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; मशालीला झुकतं माप, रेल्वे इंजिन किती जागांवर लढणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल