कल्याणी कोमकर यांनी पोलिसांना काय सांगितलं?
5 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास माझा लहान मुलगा अर्णव कोमकर हा ए.डी. कॅम्प चौक पुणे येथे सलीम सर यांच्याकडे ट्युशनसाठी गेला होता, त्याची ट्युशन सायंकाळी 7 वाजता सुटत असल्याने माझा मोठा मुलगा आयुष हा त्याला घेण्यासाठी ए.डी. कॅम्प चौकामध्ये अँक्टीव्हा गाडी घेवून गेला. मी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरामध्ये एकटीच असतांना मला बिल्डींगमधील अश्विनी आणि दुडम काका यांनी फोन करुन कळविलं की, तुमचा मोठा मुलगा आयुष याला कुणीतरी मारहाण केली आहे. म्हणून मी बिल्डींगच्या खाली येऊन बघितलं असता पार्कीगमध्ये लोकांची गर्दी होती. तसेच माझा मोठा मुलगा आयुष हा रक्तबंबाळ अवस्थेत पार्कीगमध्ये जमीनीवर पडलेला होता.
advertisement
समोरुन फायरींग केली अन् आयुष कोसळला
माझा लहान मुलगा अर्णव हा रडत होता, मी त्यास आयुषला कुणी मारलं आहे? याबाबत विचारल्यावर तो मला म्हणाला की, "दादा आणि मी ट्युशन सुटल्यानंतर आपल्या अॅक्टीव्हा गाडीवरुन पार्कीगमध्ये आलो, मी गाडीच्या खाली उतरलो आमि दादाने गाडी पार्क केली, तितक्यात आमच्या पाठीमागून पार्कीगमध्ये दोन मुले पळत आले आणि माझा भाऊ आयुष यांच्याकडे बघत असतांना त्या दोघांनी त्यांच्याकडील पिस्टलने आयुष याच्यावर समोरुन फायरींग केली. त्यामध्ये पिस्टलमधील बुलेट हा आयुषला लागुन आयुष हा खाली पडला असल्याचे सांगितलं."
बंडू आंदेकरसह इतर पाच जणांना अटक
दरम्यान, कल्याणी कोमकर यांनी दोन्ही फायरिंग करणाऱ्या आरोपींना ओळखलं असून अमन पठाण आणि यश पाटील अशी दोघांची नावं आहेत. दोन्ही आरोपी आंदेकर टोळीसाठी काम करत असल्याचा आरोप देखील कल्याणी कोमकर यांनी एफआयआरमध्ये केला आहे. त्यानंतर या दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच बंडू आंदेकरसह इतर पाच जणांना देखील पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळतीये.