Pune Crime : बंडू आंदेकरसह इतर पाच जणांना अटक, आयुषच्या मारेकऱ्यांच्या आवळल्या मुसक्या, पण मास्टरमाईंड फरार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime Bandu Andekar Arrest : आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर सह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Crime News : पुण्यातील गँगवॉर पुन्हा डोकं वर काढत असल्याचं समोर येत असताना आता पुणे पोलिस अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकर याच्या 19 वर्षाच्या मोठ्या मुलाची पुण्याच्या नाना पेठेत हत्या केली. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत बंदू आंदेकर याला अखेर अटक केली आहे. बंदू आंदेकर याच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यातील 6 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात बंडू आंदेकरचा देखील समावेश आहे.
बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू आणि शूटर अमन पठाण ही असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय. इतर दोघांमध्ये स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
आधी दोघांना अटक
आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली होती. यात प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा समावेश होता. आता या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
कृष्णा आंदेकर अजूनही फरार
दरम्यान, मागील तीन दिवस पोलिसांनी आरोपींवर पाळत ठेवली. गणेश उत्सव आणि आयुषचा अंत्यसंस्कार या दोन्ही घटना शांततेत पार पाडल्या. यानंतर आंदेकर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पण या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 09, 2025 8:25 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : बंडू आंदेकरसह इतर पाच जणांना अटक, आयुषच्या मारेकऱ्यांच्या आवळल्या मुसक्या, पण मास्टरमाईंड फरार!