Nepal Unrest : राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर हल्ला, मंत्र्याचे घर जाळलं, नेपाळमध्ये 'Gen Z'चा हैदोस, पीएम पलायनाच्या तयारीत?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nepal Gen Z Protest : सोशल मीडिया अॅप बंदीवरून नेपाळमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. नेपाळ सरकारने बंदी मागे घेतल्यानंतरही हिंसक आंदोलन सुरू आहे.
काठमांडू: सोशल मीडिया अॅप बंदीवरून नेपाळमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. नेपाळ सरकारने बंदी मागे घेतल्यानंतरही हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या तरुणांनी राष्ट्रपतींचे घरावर हल्ला करत जाळपोळ केली आहे. तर, कायदा मंत्र्याचे घर जाळले आहे. काही वृत्तांनुसार नेपाळचे पंतप्रधान केपी ओली हे राजीनामा देण्याच्या तयारीत असून देशाबाहेर पलायन करण्याची शक्यता आहे.
9 मंत्र्यांचे राजीनामे...
नेपाळमधील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. मंगळवारी (9 सप्टेंबर) केपी ओली सरकारमधील 9 मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या मंत्र्यांनी सोमवारी सोशल मीडिया बंदीवरून झालेल्या हिंसक जनरल-झेड निदर्शनादरम्यान सरकारी धोरणे आणि सरकारी कृती हे राजीनाम्याचे कारण असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, नेपाळमधील बिरगंज येथे नेपाळ सरकारचे कायदा मंत्री अजय कुमार चौरसिया यांचे घरही जाळण्यात आले आहे.
advertisement
राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये प्रामुख्याने कृषी, शिक्षण, आरोग्य आणि माहिती मंत्रालयाशी संबंधित मंत्री आहेत. सरकारने नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी आणि लोकशाही अधिकारांचा आदर न करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. तसेच, उपपंतप्रधानांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा केवळ काँग्रेसमध्येच नव्हे तर सरकारच्या उच्चस्तरीय पातळीवरही राजकीय असंतोष पसरल्याचे संकेत आहे.
पंतप्रधान ओली यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक..
advertisement
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी तातडीने सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे.परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि अर्थपूर्ण तोडगा काढण्यासाठी मी संबंधित पक्षांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.
काठमांडूमध्ये निदर्शने नियंत्रणाबाहेर, लष्कराने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तरुणांच्या सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. निदर्शकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली, त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराने अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
September 09, 2025 12:37 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Nepal Unrest : राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर हल्ला, मंत्र्याचे घर जाळलं, नेपाळमध्ये 'Gen Z'चा हैदोस, पीएम पलायनाच्या तयारीत?