पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला
निलेश घायवळने पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. निलेश घायवळने फेक पासपोर्ट काढून पळ काढला आहे. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी देखील करण्यात आलीये. पुणे पोलिसांचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारांना पकडण्यासाठी महत्त्वाचे मानलं जात आहे.
advertisement
घायवळचा खेळ खल्लास?
पुणे पोलिसांकडून युके हाय कमिशनला पाठवण्यात आलेल्या या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, घायवळवर पुण्यातील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला शोधून काढावे आणि त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला कळवावी, अशी विनंती पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनकडे केली आहे. त्यामुळे आता घायवळचा खेळ खल्लास होणार का? असा सवाल विचारला जातोय.
निलेश घायवळची आर्थिक नाकेबंदी
दरम्यान, बँक खाती गोठवून पोलिसांनी घायवळची आर्थिक नाकेबंदी केली. तर, दुसरीकडे पासपोर्ट रद्द करून आणखी एक दणका दिला. घायवळ टोळीवर पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. निलेश घायवळ टोळीतला फरार आरोपी अमोल बंडगर भिगवण येथून ताब्यात घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याआधी पोलिसांनी घायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकला होता. त्यानंतर त्याची बँक खाती गोठवली गेली होती.
