TRENDING:

मुंबई-पुणे हायवेवरील कात्रज बोगद्याजवळ उंच कड्यावर महिलेचं धक्कादायक कृत्य, इतक्यात पोलीस आले अन् तो थरार

Last Updated:

मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ शुक्रवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: मुंबई-पुणे महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ शुक्रवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एक महिला जीव देण्यासाठी डोंगराच्या अतिशय उंच आणि धोकादायक कड्याचा टोकावर उडी मारण्याच्या तयारीत उभी होती. मात्र, पुणे पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे आणि प्रभावी समुपदेशनामुळे या महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
कात्रज बोगद्याजवळ थरार (प्रतिकात्मक फोटो)
कात्रज बोगद्याजवळ थरार (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील डोंगरावर एक महिला संशयास्पद रितीने वावरताना दिसली. ती महिला डोंगराच्या अशा कड्यावर जाऊन उभी राहिली, जिथून खाली पडल्यास मृत्यू अटळ होता. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

advertisement

माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. महिला अत्यंत टोकाच्या भूमिकेत होती, त्यामुळे तिला पकडण्यासाठी धावपळ करणे धोक्याचे ठरू शकले असते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

पोलिसांनी अतिशय संयमाने दुसऱ्या बाजूने महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. तिला बोलण्यात गुंतवून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. "ताई, खाली या, आपण बसून बोलू, सर्व प्रश्न सुटतील," अशा शब्दांत पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. काही तासांच्या थरारानंतर पोलिसांच्या शब्दावर विश्वास ठेवून ती महिला कड्यावरून सुरक्षित खाली उतरली. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका कुटुंबाचा आधार वाचला असून, पुणे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मुंबई-पुणे हायवेवरील कात्रज बोगद्याजवळ उंच कड्यावर महिलेचं धक्कादायक कृत्य, इतक्यात पोलीस आले अन् तो थरार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल