मी स्वत: यावर खुलासा करेन... - अजित पवार
उद्या मुंबईत अजित पवार आढावा घेणार असून येत्या 26 तारखेला अजित पवार घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता आहे. काही वेळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य रंगत असताना आता मी स्वत: यावर खुलासा करेन, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
26 तारखेचा मुहूर्त निवडला
कार्यकर्ते नाराज होऊ शकतात, त्यामुळे कुणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, काही इच्छुक उमेदवार फिरले जाण्याची शक्यता असल्याने अजित पवार यांनी 26 तारखेचा मुहूर्त निवडल्याची माहिती मिळतीये. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीसाठी एकत्र लढणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली.
प्रशांत जगताप यांचा राजीनामा
शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोमवारी सोपवल्याची माहिती समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास जगतापांनी केलेला स्पष्ट विरोध त्यांना भोवला असल्याची चर्चा आहे.
