जड अंतकरणाने कंपनीतून बाहेर पडले
कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतं, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50 टक्के भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. बरररंररं खरंच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे... कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही, असा आरोप देखील धंगेकर यांनी केला आहे.
advertisement
प्रोजेक्टमध्ये 30000 कोटींचा फायदा...
त्यामुळे कंपनीच्या भविष्यातील 30000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का? काय वाटतं? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी विचारला अन् मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच खुशाल पुणेकरांना वेड्यात काढताय, असं म्हणत मोहोळ यांना शिंगावर देखील घेतलं आहे.
जमीन व्यवहाराला अखेर स्थगिती
दरम्यान, पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी सुनावणीनंतर अखेर स्थगिती दिली आहे. हे वसतिगृह आणि जैन मंदिर वाचवण्याच्या जैन समाजाच्या मागणीला अखेर यश आले. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप झाला होता.