नेमकी घटना काय?
आरोपी अभिषेक राजाराम श्रीनामे (वय २२) याचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, तिने त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव फेटाळला. या नकाराचा राग सहन न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास, जेव्हा सर्व नागरिक झोपेत होते, तेव्हा अभिषेकने फिर्यादी भगवान घनाते यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षा आणि चार दुचाकींवर पेट्रोल ओतून त्यांना आग लावली.
advertisement
Pune News: सावधान! स्कूल व्हॅनमध्ये तुमची मुलं सुरक्षित आहेत का? व्हॅनचालकाच्या कृत्यानं पुणे हादरलं
काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत सर्व वाहने जळून खाक झाली होती. या आगीत सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अभिषेक हा स्वतः वाहने पेटवत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट करत आहेत.
