Pune News: सावधान! स्कूल व्हॅनमध्ये तुमची मुलं सुरक्षित आहेत का? व्हॅनचालकाच्या कृत्यानं पुणे हादरलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
व्हॅनमधील इतर सर्व मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर, या नराधम चालकाने पीडित मुलीला मुद्दाम पुढच्या सीटवर बसवले. गाडी चालवत असतानाच त्याने...
पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि पालकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यात एका स्कूल व्हॅनचालकाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला घरी सोडत असताना चालकाने तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. मात्र, नागरिक आणि पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पीडित मुलीची सुटका झाली असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर नेहमीच्या चालकाऐवजी एक बदली चालक स्कूल व्हॅन घेऊन आला होता. व्हॅनमधील इतर सर्व मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर, या नराधम चालकाने पीडित मुलीला मुद्दाम पुढच्या सीटवर बसवले. गाडी चालवत असतानाच त्याने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
advertisement
मुलीची परिस्थिती पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी व्हॅन थांबवून चालकाला चांगलाच चोप दिला. त्याचवेळी सतर्क नागरिकांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून व्हॅनचा नंबर कळवला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे पालकांची चिंता वाढली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्कूल व्हॅनमध्ये मुलं सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 7:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: सावधान! स्कूल व्हॅनमध्ये तुमची मुलं सुरक्षित आहेत का? व्हॅनचालकाच्या कृत्यानं पुणे हादरलं










