Pune Crime: कुत्र्यासाठी एकमेकांशी भिडले पुण्यातील तरुण; रस्त्यावरच दगड, दांडक्याने जीवघेणा हल्ला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
इकलाख यांनी, "मुक्या प्राण्याला दगड का मारता?" असा जाब विचारला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी इकलाखला मारहाण केली
पुणे : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या रोज काही ना काही घटना समोर येत आहेत. आता पुण्यातील खेड तालुक्यातील कुरुळी-चिंचोळी परिसरात किरकोळ कारणावरुन मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्याला दगड मारल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
२५ डिसेंबर रोजी सायंकाळी कुरुळी-चिंचोळी परिसरात फिर्यादी इकलाख जमालुद्दीन सुलेमानी (वय २३) हे आपल्या गाडीत बसले होते. यावेळी तिथे असलेल्या दोघांनी एका कुत्र्याला विनाकारण दगड मारला. प्राण्याप्रती असलेल्या दयेपोटी इकलाख यांनी, "मुक्या प्राण्याला दगड का मारता?" असा जाब विचारला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी इकलाख आणि त्यांचे सहकारी इकरार खान यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली.
advertisement
या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे मित्र जखमी झाले आहेत. २७ डिसेंबर रोजी इकलाख सुलेमानी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी रितिककुमार गोपाल बैठा (वय २०) आणि मृत्युंजय खेदना बैठा (दोघेही रा. बिहार) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: कुत्र्यासाठी एकमेकांशी भिडले पुण्यातील तरुण; रस्त्यावरच दगड, दांडक्याने जीवघेणा हल्ला











