'या' महिन्याच्या अखेरीस होणार धमाका, मार्केटमध्ये एंट्री मारणार या 5 गाड्या
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Upcomig Cars In The Second Half Of February 2026: या महिन्याच्या सेकंड हाफमध्ये ऑटो मार्केटमध्ये मोठा धमाका होणार आहे. 5 भारी गाड्या फेब्रुवारीच्या सेकंड हाफमध्ये एंट्री मारणार आहेत.
मुंबई : फेब्रुवारी 2026 चा सेकंड हाफ भारतीय ऑटोमोबाईल बाजारासाठी रोमांचक ठरणार आहे. येथे अनेक नवनवीन कार लॉन्च होणार आहेत. ईको-फ्रेंडली ईव्हीपासून तर लग्जरी एसयूव्हीपर्यंत नवीन गाड्या टेक्निकल इनोवेशन, चांगली रेंज आणि आकर्षक डिझाइनसह येत आहेत. मारुती सुझुकी आणि टोयोटासारख्या ब्रांड ईव्ही सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत आहेत. तर टाटा, निसान आणि फॉक्सवॅगन अपडेटेड मॉडल्स सादर करत आहेत.
या कार 10 लाखांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध असतील. ज्या बजेटपासून प्रीमियम खरेदीदारांना आकर्षित करतली. वाढत्या ईव्ही डिमांडमध्ये हे लॉन्च बाजाराला नवीन ऊर्जा देईल आणि कंपटीशन वाढवेल. एकूणच, हा महिना ऑटो इंथुजिआस्टसाठी खुप भारी असणार आहे. चला अपकमिंग इव्हेंट्सवर एक नजर टाकूया.
advertisement
Volkswagen Tayron R-Line
फॉक्सवॅगन टॅरॉन आर-लाइन फॉक्सवॅगनची फ्लॅगशिप एसयूव्ही आहे. जी फेब्रुवारीच्या अखेरीस लॉन्च होईल. ही 7-सीटर एसयूव्ही टिगुआनचा मोठा व्हर्जन आहे. ज्यामध्ये 2.0-लीटर टीएसआय पेट्रोल इंजिन आहे. जे 204 पीएस पॉवर आणि 320 एनएम टॉर्क देते. 7-स्पीड डीएसजी गियरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्हसह ही शानदार परफॉर्मेंस देईल. डिझाइनमध्ये कनेक्टेड एलईडी लाइट्स, शार्प लाइन्स आणि मॉडर्न लूक आहे. इंटीरियरमध्ये ड्यूअल-स्क्रिन सेटअप, एडास आणि प्रीमियम फीचर्स आहेत. अंदाजे किंमत 48-50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
advertisement
Toyota Urban Cruiser Ebella EV
टोयोटा अर्बन क्रूझर एबेला ईव्ही टोयोटाची पहिली मास-मार्केट इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. जी 16-19 फेब्रुवारीला लॉन्च होईल. ही मारुती ई-विटाराचा रिबॅज्ड व्हर्जन आहे. ज्यामध्ये 49 kWh किंवा 61 kWh बॅटरी पॅक आहे आणि 500 किमीहून जास्त रेंज मिळते. डिझाइनमध्ये पिक्सल-स्टाइल एलईडी लाइट्स, स्लीक बंपर्स आणि क्लीन लूक आहे. इंटीरियरमध्ये ड्यूअल स्क्रीन्स एडास आणि सेफ्टी फीचर्स आहेत. अंदाजे किंमत 16-20 लाख रुपये आहे. जी टाटा कर्व्ह ईव्ही आणि हुंडई क्रेटा ईव्हीला टक्कर देईल.
advertisement
Maruti Suzuki e Vitara
मारुती सुझुकी ई विटारा कंपनीची पहिली बॉर्न-इलेक्ट्रिक कार आहे. जी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत येईल. HEARTECT-e प्लेटफॉर्मवर तयार ही एसयूव्ही 49 kWh आणि 61 kWh बॅटरीसह 500 किमीहून जास्त रेंज देईल. रग्ड डिझाइन, ड्यूअल-स्क्रिन इंटीरियर, एडास आणि अडव्हान्स फीचर्ससह येईल. अंदाजे किंमत 15-30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही टाटा कर्व्ह ईव्ही, एमजी जेडएस ईव्ही आणि ह्युंडई क्रेटा ईव्हीला टक्कर देईल.
advertisement
Tata Punch EV Facelift
टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट 20 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. हे अपडेटेड मॉडेल 40.5 kWh बॅटरी पॅकसह 500 किमी पर्यंतची रेंज देण्याची शक्यता आहे. डिझाइनमध्ये नवीन ग्रिल, एलईडी लाईट्स आणि आधुनिक अपडेट्स आहेत. इंटीरियरमध्ये सुधारित फीचर्स, मोठी टचस्क्रीन आणि सेफ्टी किट समाविष्ट आहे. अंदाजे किंमत 9.99-14.5 लाख आहे. ही कॉम्पॅक्ट ईव्ही या सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय असेल, जी बजेट ईव्ही खरेदीदारांना आकर्षित करेल.
advertisement
Nissan Gravite
निसान ग्रेवाइट 17 फेब्रुवारीला डेब्यू करेल. ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही रेनो ट्रायबरवर आधारित आहे. जी सब-4M सेगमेंटमध्ये 7-सीटर ऑप्शन देईल. डिझाइनमध्य यूनिक ग्रिल, एलईडी लाइट्स आणि मॉडर्न लूक आहे. इंजिन ऑप्शनमध्ये 1.0-लीटर पेट्रोलचा समावेश असू शकतो. अंदाजे किंमत 6.9 लाख रुपये आहे. जी बजेट फॅमिली कारच्या रुपात आकर्षक ठरेल. हे निसानचं भारतीय बाजारात कमबॅक बजबूत करेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 6:37 PM IST








