'हो, मला ती आवडते', विशाल कोटियनची नॅशनल टीव्हीवर प्रेमाची कबुली; दिपालीच्या टोमण्याने रुचिताचा पारा चढला, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6: रुचितासोबतच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत असतानाच विशालने सर्वांसमोर आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या वादळ उठलं आहे, पण हे वादळ केवळ भांडणाचं नाही, तर प्रेमाचं आहे. घरामध्ये एकीकडे नॉमिनेशनची टांगती तलवार असतानाच, दुसरीकडे रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत असतानाच विशालने सर्वांसमोर आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. 'बादली' टास्क आणि राखी सावंतची अनपेक्षित एक्झिट यातच प्रेमकाहाणीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
घरासमोर विशालची जाहीर कबुली
या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कची थीम अत्यंत रंजक आहे. 'नॉमिनेशनची बादली' असं या टास्कचं नाव असून, ज्याला नॉमिनेट करायचं आहे, त्याला बादलीखाली बसवून कारण द्यायचं आहे. यानंतर त्या स्पर्धकावर बादलीतील पाणी पडते. टास्कदरम्यान विशालने रूपालीला नॉमिनेट करताना एक खळबळजनक विधान केलं. तो म्हणाला, "रुचिता विशालचं ऐकते? हो, ती ऐकते! आणि आता मी सगळ्यांसमोर सांगतो, मला रुचिता आवडते!"
advertisement
विशालच्या या कबुलीवर रूपालीने खोचक टिप्पणी करत म्हटलं की, "हे प्रेम घराबाहेरही टिकू दे." यावर मात्र रुचिताचा पारा चढला. तिने रूपालीला झापत म्हटलं, "ती मला शिकवणार नाही, ती काय माझी आई-बाप आहे का?" रुचिताने आधीच अनुश्रीजवळ कबुली दिली होती की, तिला विशालचा सहवास आवडतो आणि ती त्याच्याशी खूप अटॅच आहे.
advertisement
advertisement
राखी सावंतचा खेळ खल्लास! बिग बॉसने घराबाहेर काढलं?
घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेल्या राखी सावंतने आठवडाभरात सर्वांच्या नाकात दम करून सोडला होता. राखीमुळे शोचा टीआरपी वाढला असला, तरी तिचं कृत्य आता बिग बॉसच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे. ताज्या माहितीनुसार, आठवडा संपायच्या आधीच राखीला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राखीच्या वागणुकीवर बिग बॉस प्रचंड भडकले असून, तिला तडकाफडकी बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॉमिनेशनच्या प्रोमोमध्ये राखी कुठेही दिसत नसल्यामुळे चाहत्यांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 6:41 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हो, मला ती आवडते', विशाल कोटियनची नॅशनल टीव्हीवर प्रेमाची कबुली; दिपालीच्या टोमण्याने रुचिताचा पारा चढला, VIDEO







