काय होती नेमकी घटना?
कनेरसर येथील यमाई देवी मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. २७ जुलै २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. या चोरीत देवीचा सुमारे ४०० ग्रॅम वजनाचा आणि २२ हजार ४०० रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरट्याने लांबवला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
चोरीची ही घटना घडल्यानंतर खेड पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, ४ ऑगस्ट २०१४ रोजी पारगाव (ता. आंबेगाव) येथील एका मंदिरात चोरी झाली होती. या प्रकरणात संशयित म्हणून विनायक दामू जिते (वय ३२, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने कनेरसर येथील यमाई देवीच्या मंदिरातही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून चांदीचा मुखवटा जप्त करून तो मुद्देमाल म्हणून जमा केला होता.
या खटल्याची सुनावणी राजगुरूनगर न्यायालयात पार पडली. सहायक सरकारी वकील अॅड. ए. एस. चव्हाण यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी बाजू मांडली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीवरून न्यायालयाने विनायक जिते याला दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
यमाई देवीचे हे मंदिर पुरातन असून येथे भाविक श्रद्धेने दान अर्पण करतात. मात्र, २०१४ मधील या घटनेनंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या निकालानंतर आता देवस्थान समित्यांनी मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यावर भर दिला आहे.
