अत्याचारानंतर दिला होता धमकीचा दम
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. ती घरात एकटी असल्याचे पाहून नराधम अल्पवयीन आरोपीने तिथे प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर त्याने चिमुकलीला कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली आणि तो तिथून पसार झाला. घाबरलेल्या मुलीने कोणालाही काही सांगितलं नाही, मात्र अखेर ते उघड झालं.
advertisement
असं उघड झालं धक्कादायक सत्य
सायंकाळच्या सुमारास अचानक या चिमुकलीला तीव्र ताप आला आणि तिची प्रकृती बिघडली. मुलीला ताप आल्याने काळजीपोटी पालकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टर जेव्हा तिची तपासणी करत होते, तेव्हा त्यांना काहीतरी संशयास्पद आढळले. सखोल तपासणीत या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी तत्काळ ही बाब पालकांच्या कानावर घातली.
पोलीस कारवाई
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर हादरलेल्या पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला. पालकांनी क्षणाचाही विलंब न लावता शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर 'पोक्सो' (POCSO) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर कान्हूर मेसाई गावात तीव्र संताप व्यक्त होत असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
