हे मार्ग राहतील बंद
टाटा टी चौक ते वाकड नाका, जॉमेट्रिक सर्कल ते वाकड नाका, शिवाजी चौक ते भुमकर चौक, इंडियन ऑइल चौक ते विनोदे वस्ती आणि वाकड नाका, मुळा नदी पूल पंक्चर ते वाकड नाका (भुजबळ चौक), जॅग्वार शोरूम ते सयाजी अंडरपास दरम्यानचा सेवा रस्ता (Service Road) हे मार्ग मिरवणुकीच्या वेळेत बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा .
advertisement
वाहतूक पोलिसांचे पर्यायी मार्ग:
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
1. पर्यायी चौक: लक्ष्मी चौक, भुमकर चौक, मेझा-९ चौक, इंडियन ऑइल चौक आणि वाकडगाव.
2. महामार्गाचा वापर: सेवा रस्ता बंद असल्याने चालकांनी थेट राष्ट्रीय महामार्गाचा (NH-48) वापर करावा.
3. वाकड परिसर: कस्पटे चौक, मानकर चौक आणि वाकडगाव चौक परिसरात निर्बंध असल्याने जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा, म्हातोबा चौक आणि दत्तमंदिर रस्ता या मार्गांनी प्रवास करावा.
आयटी पार्कमध्ये कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी या बदलांची नोंद घ्यावी, जेणेकरून वेळेचा अपव्यय टाळता येईल. शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
