नेमकी घटना काय?
तिरुपती हुलगप्पा कुऱ्हाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पूजा आणि तिरुपती हे मूळचे कर्नाटकचे असून ८ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मात्र, संसाराची काही वर्षे उलटल्यानंतर तिरुपतीला दारूचे व्यसन लागले आणि तिथूनच पूजाच्या छळाला सुरुवात झाली.
दारूसाठी पैशांची मागणी आणि मारहाण
आरोपी पतीला कामापेक्षा दारूचे व्यसन जास्त होते. तो वारंवार पूजाकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत असे. पैसे न दिल्यास तिला अमानुष मारहाण केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी तिरुपतीने पूजाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली होती. या सततच्या त्रासामुळे पूजा पूर्णपणे खचून गेली होती. अखेर या जाचातून सुटका मिळवण्यासाठी तिने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
advertisement
या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पूजाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वारजे पोलिसांनी तिरुपती कुऱ्हाडे याला अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ८ वर्षांच्या संसाराचा असा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
