लग्नानंतरही वैवाहिक संबंधांना नकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह आरोपी पतीसोबत 11 एप्रिल 2025 रोजी झाला होता. लग्नाला सहा महिने उलटूनही पती-पत्नीमध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून पती पत्नीपासून दूर राहत असे आणि त्याने शरीरसंबंध ठेवण्यास सातत्याने नकार दिला. महिलेने पुढाकार घेऊन प्रयत्न केला, तरी तो घराबाहेर जाऊन झोपत होता.
advertisement
जेव्हा विवाहितेने ही बाब सासरच्या मंडळींना (सासू, नणंद, चुलत नणंद आणि चुलत सासरे) सांगितली, तेव्हा त्यांनी तिला मदत करण्याऐवजी 'बाहेर कुणाला सांगू नकोस' अशी धमकी दिली. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा वारंवार छळ केला जात होता.
Vastu Shastra : घरात सारखे वाद होतात, होणारी कामं बिघडतायंत! तुमच्या बाल्कनीत 'ही' रोपं तर नाही ना?
डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिल्याने अत्याचार
अत्याचाराला कंटाळून महिलेने अखेरीस पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांना सांगितले की, पतीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिने त्याला डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला. पतीने आपण फिट असल्याचे सांगत तो सल्ला धुडकावून लावला. यानंतर महिलेने माहेरी जाण्याची धमकी देताच, आरोपी पती संतापला. त्याने विवाहितेला बेडरूममध्ये नेले आणि तिचा छळ करत तिच्या गुप्तांगावर आणि मांडीवर सिगारेटचे गंभीर चटके दिले. या अमानुष कृत्यानंतर पीडित महिला सध्या माहेरी राहत आहे.
या गंभीर प्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि खळबळ व्यक्त होत आहे.
