TRENDING:

पुण्याच्या झेडपी अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला, राजकीय हालचालींना वेग; कार्यक्रम जाहीर

Last Updated:

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून बहुमताच्या जोरावर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर आपलेच उमेदवार निवडून आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 18 मार्च 2026 रोजी होत असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेचा नवा कारभारी कोण ठरणार हे 18 मार्चला स्पष्ट होणार असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
News18
News18
advertisement

पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक आहे. ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर असते. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर विराजमान होणाऱ्या नेतृत्वाकडे केवळ प्रशासकीय क्षमता नव्हे, तर राजकीय समतोल राखण्याचे कौशल्यही अपेक्षित असते. सध्या पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून बहुमताच्या जोरावर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर आपलेच उमेदवार निवडून आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

advertisement

सुनेत्रा पवार काय म्हणाले?

सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. अजितदादानी जी.स्वप्न पाहिली होती ती आपल्याला आता पूर्ण करायचे आहेत, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. गाव खेड्यातील बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपल्या सूचना आणि सल्ल्याचा आदर केला जाणार माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

advertisement

संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व सदस्यांशी समन्वय साधत पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि रणनीती आखली जात आहे. नेतृत्वाच्या निवडीबाबत अनुभव, सामाजिक समतोल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांकडूनही आपली भूमिका आक्रमकपणे घेण्याचे प्रयत्न सुरू असून संख्याबळ कमी असले तरी राजकीय दबाव वाढवण्यासाठी ते सज्ज असल्याचे दिसते.

advertisement

जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीचा मुहूर्त ठरला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

पुणे जिल्हा परिषद ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून  ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर निवडून येणाऱ्या नेतृत्वाकडून विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी ठोस निर्णय घेतले जावेत, अशी जनतेची भावना आहे 18 मार्च रोजी होणारी ही निवडणूक केवळ पदांची निवड ठरवणारी नसून आगामी राजकीय समीकरणांची दिशा दर्शवणारी ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या झेडपी अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला, राजकीय हालचालींना वेग; कार्यक्रम जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल