नेमकं काय म्हणाले शरद पवार?
'मोदीसाहेब, तुम्ही आणि तुमचा पक्ष आणि तुमचा विचार तुम्हालाच लखलाभ. मी आणि उद्धवजी कदापिही तुमच्यासोबत येणार नाही,' असं शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची ऑफर नाकारताना म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदीजी तुम्ही लोकशाहीत सत्तेचा गैरवापर करून दोन मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि खासदारांना तुरुंगात टाकलं. याचा अर्थ हे राज्य तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं चालवत आहात. म्हणून हे सरकार उलथून टाका असं आवाहन यावेळी या सभेसाठी उपस्थित असलेल्या जनतेला पवार यांनी केला आहे.
advertisement
'पंतप्रधान सातत्यानं खोटा प्रचार करत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्राचा कुठेही उल्लेख नाही. तरीही ते खोटा अपप्रचार करत आहेत, ते म्हणतात काँग्रेस सत्तेत आली तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतलं जाईल,' असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.