TRENDING:

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या कोंडीला आता कायमचा 'ब्रेक'! सरकारचा मोठा प्लॅन, प्रवाशांचा वेळ आणि पैसाही वाचणार

Last Updated:

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि टँकर अपघातासारख्या घटनांमुळे प्रवाशांचे होणारे हाल पाहता, आता राज्य सरकारने एका मोठ्या पर्यायी मार्गाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि टँकर अपघातासारख्या घटनांमुळे प्रवाशांचे होणारे हाल पाहता, आता राज्य सरकारने एका मोठ्या पर्यायी मार्गाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत हा नवा प्रस्तावित महामार्ग एक्सप्रेसवेवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 'गेमचेंजर' ठरणार आहे.
शिरूर-कर्जत नव्या मार्गाला गती (AI Image)
शिरूर-कर्जत नव्या मार्गाला गती (AI Image)
advertisement

एक्सप्रेसवेवरील कोंडीवर जालीम 'उतारा'

सध्या मराठवाडा आणि अहिल्यानगरहून मुंबईकडे जाणारी बहुतांश वाहतूक चाकण-तळेगावमार्गे लोणावळ्यातून एक्सप्रेसवेवर येते. यामुळे खंडाळा घाटात वाहनांचा प्रचंड भार वाढतो. मात्र, शिरूर-कर्जत हा नवा मार्ग तयार झाल्यामुळे मराठवाड्यातून येणारी जड वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला पोहोचेल. म्हणजेच, मुंबईला जाण्यासाठी लोणावळा घाटात न शिरता एक स्वतंत्र आणि जलद मार्ग उपलब्ध होईल.

advertisement

प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये:

हा रस्ता आधुनिक चारपदरी मल्टिमोडल कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाणार असून त्याची लांबी १३५ किमी असेल. पहिल्या टप्प्यात ६० किमी आणि दुसऱ्या टप्प्यात ७५ किमीचे काम पूर्ण केले जाईल. या मार्गावर ५ बोगदे, ६ मोठे पूल आणि ४८ लहान पूल बांधले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवास सुसाट होईल. या प्रकल्पासाठी सुमारे साडेबारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, तो 'बीओटी' (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर राबवला जाणार आहे.

advertisement

औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा

चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्यातील जड वाहतुकीमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या अंतर्गत रस्त्यांवर होणारी कोंडी या नव्या मार्गामुळे ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. ६७० हेक्टर जमीन संपादनाचे काम वेगाने पूर्ण करून या प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणे-मुंबईचा नाद सोडला अन् गाव गाठलं, अर्ध्या एकरात केली शेती, 3 महिन्यात लखपती
सर्व पहा

शिरूर-कर्जत महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'डेडलॉक' कायमचा फुटेल आणि प्रवाशांना 30 तास भयंकर कोंडीत अडकण्यासारख्या संकटातून मुक्ती मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या कोंडीला आता कायमचा 'ब्रेक'! सरकारचा मोठा प्लॅन, प्रवाशांचा वेळ आणि पैसाही वाचणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल