TRENDING:

Pune: कोयता नव्हे आता पिस्तुल! पुण्यात अल्पवयीन गुन्हेगाराकडून गोळीबार, 2-3 राऊंड केले फायर; परिसरात खळबळ

Last Updated:

काल परवा पर्यंत कोयत्या घेऊन गल्ली बोळात दहशत पसरवण्याच्या घटना समोर आल्या होता. आता अल्पवयीन सराईत गुन्हेगार गोळीबार

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे नगरीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. काल परवा पर्यंत कोयत्या घेऊन गल्ली बोळात दहशत पसरवण्याच्या घटना समोर आल्या होता. आता अल्पवयीन सराईत गुन्हेगार गोळीबार करत असल्याची घटना समोर आली आहे. दोन गटातून गुलटेकडी परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पुण्यातील गुलटेकडी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.  अल्पवयीन सराईत आरोपीने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.  या अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने हवेत दोन ते तीन राऊंड फायर केले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने या गोळीबार कुणीही जखमी झालं नाही.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. पोलिसांनी जेव्हा तपास केला असता दोन गटातील वादातून गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडून परिसरात भीतीच वातावरण पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात कुणीही जखमी झालं नसलं तरी दहशत पसरवण्यासाठी गोळीबाराची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन गुन्हेगारांकडे पिस्तुल, बंदुका येतात कुठून? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्या अल्पवयीन गुन्हेगाराने गोळीबार केला, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन गुन्हेगाराचाा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune: कोयता नव्हे आता पिस्तुल! पुण्यात अल्पवयीन गुन्हेगाराकडून गोळीबार, 2-3 राऊंड केले फायर; परिसरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल