TRENDING:

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं निधन

Last Updated:

गजानन भास्कर मेहेंदळे, म्हणजेच गजाभाऊ मेहेंदळे, हे एक ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे:   ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
News18
News18
advertisement

गजानन भास्कर मेहेंदळे हे एक ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर त्यांचे संशोधन खूप सखोल होते. त्यांनी केवळ पुस्तके लिहिली नाहीत, तर इतिहासातील अनेक गोष्टींचा चिकित्सक अभ्यास करून त्या पडताळून पाहिल्या.

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी गेली ५० वर्षे  इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहासातील सत्य आणि असत्य हे उघड करणं हा त्यांचा आवडता विषय होता. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते.

advertisement

१९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांवर आणि इतिहासातल्या लिप्यांचा अभ्यास होता.

त्यांनी शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.

advertisement

गजानन भास्कर मेहेंदळे यांचे कार्य

सखोल संशोधन: गजाभाऊंनी केवळ उपलब्ध संदर्भ वाचले नाहीत, तर त्यामागील सत्यता तपासली. त्यांनी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे, मोडी लिपीतील दस्तऐवज आणि जुने नकाशे यांचा अभ्यास केला. यामुळे त्यांच्या लिखाणाला एक वेगळीच खोली मिळाली.

वैज्ञानिक दृष्टिकोन: इतिहासातील कथा आणि आख्यायिकांवर विसंबून न राहता, त्यांनी प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले. त्यामुळे, त्यांच्या लिखाणात भावनेपेक्षा सत्याला अधिक महत्त्व दिले गेले.

advertisement

‘शिवाजी महाराजांचे चरित्र’: त्यांनी 'श्री राजा शिवछत्रपती' या नावाने शिवाजी महाराजांचे विस्तृत चरित्र लिहिले. हे चरित्र त्यांच्या संशोधनाचा गाभा आहे.

माहितीची सत्यता: त्यांच्या संशोधनात अनेक प्रस्थापित समजुतींना आव्हान दिले गेले. उदा. अफजलखानाच्या वधाची घटना त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडली.

मराठी बातम्या/पुणे/
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल