कधी आणि कुठे या गाड्या धावणार?
पुणे एसटी विभागाने 10 एप्रिल ते थेट 10 जून 2026 या दोन महिन्यांच्या काळासाठी हा विशेष उपक्रम आखलेला आहे. यात प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि नोकरीसाठी असलेले जण सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. एसटी स्थानकांवरील होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी या जादा बसेस विविध महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत.
advertisement
या शहरांसाठी विशेष बस सेवा
पुण्यातून अक्कलकोट तर तासगाव, कोल्हापूर,पंढरपूर,जळगाव,सप्तशृंगी गड, अकोला, अहमदपूर आणि गोंदवले या प्रमुख शहरांसाठी आणि तीर्थक्षेत्रांच्या मार्गावर या गाड्या सोडल्या जाणार आहेत.
प्रवाशांसाठी दिलासा
एसटी प्रशासनाने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे प्रवाशांना आता खाजगी ट्रॅव्हल्सच्या अव्वाच्या सव्वा दरांपासूनही सुटका मिळणार आहे. आणि परवडणाऱ्या प्रवासाचा आनंद घेता येईल.
