TRENDING:

ज्वारी काढायला गेलेली महिला; अचानक आधी डोक्याचे केस उपटले गेले अन् मग...जागीच मृत्यू, पुण्यात धक्कादायक घटना

Last Updated:

मशीनचा वेग इतका प्रचंड होता की, मंगल यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि त्या थेट मशीनकडे ओढल्या गेल्या. त्यांचं डोकं मशीनमध्ये अडकलं

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुरंदर तालुक्यातील वनपुरी परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. शेतात ज्वारीची मळणी करत असताना, मळणी यंत्रात स्कार्फ अडकल्याने एका ५५ वर्षीय शेतकरी महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मंगल तुकाराम कुंभारकर असे या मृत महिलेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण पुरंदर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
ज्वारीची मळणी करताना अपघात (प्रतिकात्मक फोटो)
ज्वारीची मळणी करताना अपघात (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगल कुंभारकर या माळशिरस येथील पाटीलवस्ती परिसरात आपल्या मुलासोबत ज्वारीची कणसे मळणी यंत्रात टाकण्याचे काम करत होत्या. उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी डोक्याला स्कार्फ बांधला होता. मात्र, काम करत असताना अचानक हा स्कार्फ मशीनच्या फिरत्या चक्रात अडकला. मशीनचा वेग इतका प्रचंड होता की, मंगल यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि त्या थेट मशीनकडे ओढल्या गेल्या. त्यांचं डोकं मशीनमध्ये अडकलं. मशीन मालकाने तत्काळ यंत्र बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या भीषण अपघातात मंगल यांचा जागीच अंत झाला.

advertisement

एकाच दिवशी दोन थरार

धक्कादायक बाब म्हणजे, याच दिवशी वनपुरी भागात दुसरी अशीच घटना घडली. चंद्रभागा मारुती कुंभारकर या देखील मळणी यंत्रात स्कार्फ अडकल्याने जखमी झाल्या. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत स्कार्फ सोडवल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र त्यांच्या डोक्याचे केस उपटले गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

या घटनेत रुग्णवाहिका चालक दत्तात्रय कुंभारकर यांची कर्तव्यनिष्ठा प्रकर्षाने दिसून आली. स्वतःची आई (चंद्रभागा) जखमी झालेली असतानाही, त्यांनी सामाजिक जबाबदारी ओळखून मंगल कुंभारकर यांचा मृतदेह जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या घटनेमुळे शेतकरी महिलांनी यंत्रावर काम करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
ज्वारी काढायला गेलेली महिला; अचानक आधी डोक्याचे केस उपटले गेले अन् मग...जागीच मृत्यू, पुण्यात धक्कादायक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल