रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्व स्तरावर तयारी सुरू आहे. गर्भगृहापासून ते संपूर्ण राम मंदिर फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आले आहे.
advertisement
कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुर्च्या बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रात्री मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई वेगळीच छटा आसमंतात पसरत आगे. दरम्यान, राम मंदिरातील आतील फोटो समोर आले आहेत.
आतील दरवाजे आणि भव्यता फोटोंमध्ये दिसत असून मंदिराच्या खांबांवर भव्य नक्षीकाम करण्यात आले आहे.
भिंती पुतळ्यांनी सजवल्या आहेत. फोटोंमध्ये भगवान रामाचे निवासस्थान एका अद्भुत आणि अलौकिक प्रकाशात उजळून निघालेले पाहायला मिळत आहे. मंदिराची भव्यता पाहण्यासारखी आहे.
राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या नवीन मूर्तीच्या अभिषेकसाठी अयोध्येला 2500 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.
गर्भगृहाच्या सजावटीसाठी कर्नाटकातून फुले आणण्यात आली आहेत. त्यासाठी थायलंड आणि अर्जेंटिनासह दिल्ली आणि कोलकाता येथून सुंदर विदेशी फुलही मागवण्यात आली आहे.