पूजेचे 'बेलपत्र' तिजोरीत ठेवा
महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण केलेले बेलपत्र अत्यंत पवित्र आणि ऊर्जेने भरलेले असते. पूजेनंतर मंदिरातून किंवा स्वतःच्या पूजेतील एक बेलपत्र घरी घेऊन यावे. हे बेलपत्र लाल कपड्यात गुंडाळून आपल्या घराच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता, त्या ठिकाणी ठेवावे. असे मानले जाते की, बेलपत्रात माता लक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे घरामध्ये पैशांचा ओघ वाढतो आणि बरकत येते.
advertisement
पारद शिवलिंगाची स्थापना
जर तुम्हाला शक्य असेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी 'पारद शिवलिंग' विकत घेऊन घरी आणावे. वास्तुशास्त्रानुसार, महाशिवरात्रीला पारद शिवलिंगाची घरात स्थापना केल्याने पितृदोष आणि वास्तू दोष दूर होतात. या शिवलिंगाच्या नियमित पूजेमुळे घरात कधीही दरिद्रता येत नाही आणि कुबेर देव प्रसन्न राहतात.
'शिव तीर्थ'
शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानंतर, त्यातील थोडे जल आपल्या लोट्यात किंवा एका भांड्यात गोळा करावे. हे 'शिव तीर्थ' घरी आणून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि व्यवसायात किंवा नोकरीत येत असलेले अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
एक मुखी रुद्राक्ष
महाशिवरात्रीच्या दिवशी एक मुखी रुद्राक्ष घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. एक मुखी रुद्राक्ष हे प्रत्यक्ष साक्षात शिवाचे रूप मानले जाते. हे रुद्राक्ष सिद्ध करून तिजोरीत ठेवल्याने किंवा धारण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि मोठे संकट टळते.
चांदीचा नंदी
ज्यांच्या घरात सतत पैशांची चणचण भासते किंवा कर्ज वाढत चालले आहे, त्यांनी महाशिवरात्रीला चांदीचा छोटा नंदी खरेदी करून घरी आणावा. त्याची पूजा करून तो तिजोरीत ठेवावा. नंदी हा कष्टाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे या उपायाने आर्थिक अडचणी दूर होतात, असा समज आहे.
महामृत्युंजय यंत्र
घरामध्ये सुख-शांती आणि समृद्धीसाठी महाशिवरात्रीला महामृत्युंजय यंत्र घरी आणून त्याची स्थापना करावी. हे यंत्र घरामध्ये ऊर्जेचे कवच तयार करते आणि कुटुंबातील सदस्यांची आरोग्यविषयक समस्यांपासून सुटका करते, ज्यामुळे अनावश्यक खर्च थांबतो आणि बचत वाढते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
