TRENDING:

Baby Born in Grahan: ग्रहणात जन्म झालेल्यांचा स्वभाव कसा असतो? भाग्य, करिअर, आरोग्याच्या बाबतीत या गोष्टी...

Last Updated:

Holika Dahan 2026 Pregnant Women: एखाद्या बाळाचा जन्म चंद्रग्रहणाच्या दिवशी झाला, तर त्याचा स्वभाव आणि भविष्य कसं असेल? याबद्दल ज्योतिषशास्त्रात काय सांगितलं आहे, ते आपण जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिंनाक 3 मार्च 2026 रोजी हुताशनी पौर्णिमेला वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण ही एक संवेदनशील खगोलीय घटना मानली जाते, त्यामुळे या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. प्रामुख्याने गरोदर महिलांबाबत अनेक परंपरा पाळल्या जातात. अशातच, जर एखाद्या बाळाचा जन्म चंद्रग्रहणाच्या दिवशी झाला, तर त्याचा स्वभाव आणि भविष्य कसं असेल? याबद्दल ज्योतिषशास्त्रात काय सांगितलं आहे, ते आपण जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

चंद्रग्रहणाच्या दिवशी जन्मलेल्या मुलांचा स्वभाव - ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा स्वामी मानलं जातं. ग्रहणावेळी चंद्राची शक्ती कमी होते, ज्याचा परिणाम इमोशनल लेव्हलवर होऊ शकतो, असं मानलं जातं. याच कारणामुळे ग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुलं खूप भावूक आणि संवेदनशील असतात. ज्योतिषीय मान्यतेनुसार, ही मुलं छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात, पण त्यांना दुसऱ्याच्या भावनांचीही चांगली जाण असते. स्वभावाने ही मुलं प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतात. मात्र, त्यांचा मूड लवकर बदलू शकतो आणि कधीकधी त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते.

advertisement

भाग्य आणि करिअरबद्दलच्या समजूती

असं मानलं जातं की चंद्रग्रहणावेळी जन्मलेली मुलं मेहनती आणि टॅलेंटेड असतात. स्वतःच्या हिंमतीवर आपली ओळख निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असते. विशेषतः क्रिएटिव्ह क्षेत्र, रिसर्च किंवा कला क्षेत्रांत त्यांची जास्त आवड दिसून येते. ही मुलं खोलवर विचार करणारी असतात आणि आयुष्यात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतात. फक्त त्यांनी आपल्या मानसिक संतुलनावर विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.

advertisement

बापरे यांच्या नादाला कुठं लागता? या 4 बर्थडेट असणाऱ्या मुलींशी वाद घालणं म्हणजे

आरोग्य आणि उपाय - आरोग्याबद्दलची मान्यता: काही धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या दिवशी जन्मलेल्या मुलांचं आरोग्य थोडं नाजूक असू शकतं, विशेषतः मानसिक शांततेच्या बाबतीत. अर्थात, हे सर्वस्वी श्रद्धेवर आधारित विचार आहेत. अशा मुलांसाठी चंद्रदेव आणि भगवान शंकराची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे आणि आजूबाजूला सकारात्मक वातावरण ठेवणे फायदेशीर मानले जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

चंद्रग्रहण 2026 ची वेळ - 3 मार्च रोजी लागणारं हे चंद्रग्रहण दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 वाजेपर्यंत असेल. या ग्रहणाचा एकूण काळ सुमारे 3 तास 27 मिनिटांचा असेल. ज्योतिषीय गणनेनुसार हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात लागत आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Baby Born in Grahan: ग्रहणात जन्म झालेल्यांचा स्वभाव कसा असतो? भाग्य, करिअर, आरोग्याच्या बाबतीत या गोष्टी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल