रांची : तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीवर किंवा दरवाजावर कावळ्याला बसताना पाहिले असेल. ही एक सामान्य बाब आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रात कावळा घरी येण्याचे एक विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. कावळा घरी येण्याचे अनेक संकेत सांगितले गेले आहेत. जर तुमच्याही घरी कावळे येत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
झारखंडची राजधानी रांची येथील पंचवटी प्लाझा येथील अग्रवाल रतनचे ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुमच्या घरात कावळा येत असेल तर याचे अनेक अर्थ आहेत. काही वेळा हे संकेत शुभ तर काही वेळा अशुभही असतात. कावळा केव्हा आणि कसा घरी येतो, यावर हे अवलंबून असते.
advertisement
ज्योतिषाचार्य संतोष यांनी सांगितले की, जर तुमच्या घरी सकाळी सकाळी कावळा छतावर बसला असेल तर याचा अर्थ तुमच्या घरी कुणीतरी पाहुणा येणार आहे. तुम्हाला त्यासाठी विशेष तयारी करायला हवी. तसेच जर एखादा कावा तुम्ही घरातून बाहेर निघाल्यावर तुमच्याकडे पाहून काही बोलत असेल तर तुम्ही जे काही कार्य करण्यासाठी बाहेर जात आहेत, ते यशस्वी होईल, हे समजून घ्या. हा एक शुभ संकेत आहे.
‘Hello, मी डीजीपी ऑफिसमधून बोलतोय, मुलीला वाचवायचं असेल तर…’, दाम्पत्यासोबत धक्कादायक घटना
त्यांनी सांगितले की, तेच जर तुमच्या घरात कावळा समूहाने येत असेल तर तुम्हाला सतर्क होण्याची गरज आहे. याचा अर्थ असा आहे की, तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात काही अप्रिय घटना घडू शकतात. याशिवाय जर तुमच्या घरातील कावळा दक्षिणेकडे तोंड करून बोलत असेल तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत. तुमच्यावर 'पितृ दोष' आहे. त्यामुळे तुम्ही हे 'पितृ दोष' दूर करण्यासाठी उपाय करायला हवेत.
छतावर कावळा आल्यावर हे काम नक्की करा -
ज्योतिष शास्त्र संतोष कुमार चौबे पुढे सांगतात की, घरी येणारा कावळा हा कधी कधी तुमचा पूर्वज असू शकतो. म्हणूनच जर तुमच्या छतावर कावळा आला तर त्यांच्यासाठी एक वाटी धान्य किंवा पाणी किंवा काही अन्नपदार्थ ठेवा. जसे की ब्रेड इत्यादी. हे कमी प्रमाणात ठेवा. यामुळे तुमचे पूर्वज प्रसन्न राहतील.
Disclaimer : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. ज्योतिषाचार्य यांच्याशी संवाद साधल्यावर ही माहिती लिहिली गेली आहे. ही माहिती सर्वांच्या माहितीसाठी दिली आहे. लोकल18 मराठी याबाबत कोणताही दावा करत नाही.