ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्यानं सूर्य, शनिसह 6 ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात, हे सर्व ग्रह शुभ फळ देतात. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात, ज्या ग्रहांच्या बल आणि भाग्यासाठी उत्तम आहे.
मकर संक्रांती 2024 दान कराव्यात अशा वस्तू -
1. तीळ दान मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नानानंतर तिळाचे दान करावे. शक्य असल्यास या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. जर काळे तीळ नसेल तर फक्त पांढरा तीळ दान करा. असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धन-धान्य वाढते आणि शनिदोषही दूर होतो. असे म्हटले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनिदेवांनी काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले.
advertisement
या जन्मतारखांची जोडी लग्नासाठी परफेक्ट! एकमेकांच्या साथीनं बहरतो संसार
2. गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान अवश्य करा. या एका दानाने तुमच्या कुंडलीतील सूर्य, गुरु आणि शनि या तीन ग्रहांचे दोष दूर होतात. गूळ गुरू ग्रहाशी संबंधित मानला जातो. कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठीही गुळाचे दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले लाडू दान केले जातात.
3. ब्लँकेट दान मकरसंक्रांतीच्या दिवशी पूजेनंतर गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करावेत. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील राहू ग्रहाशी संबंधित दोष दूर होतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
4. काळे उडीद-हिरवे मूग-तांदळाची खिचडी दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद, हिरवे मूग आणि तांदूळ यापासून बनवलेल्या खिचडीचे दान केल्यास शनि, गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष दूर होतात. काळ्या उडीदचा संबंध शनिशी आणि हिरवा मूग बुध ग्रहाशी संबंधित आहे. खिचडीमध्ये तुम्ही हळद वापरता, जी गुरु ग्रहाशी संबंधित आहे. या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य बलवान होते. कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.
5. तांदूळ दान - मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे, तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे. यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते. तांदूळ दान केल्याने चंद्र दोषही दूर होतो. हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा
बाळासाठी खास असं नाव शोधताय? मग श्री रामावरून ही 6 युनिक नावं पाहून घ्या
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
