डोडा गणपती मंदिर असे या प्राचीन मंदिराचे नाव आहे
गणपतीच्या या प्राचीन मंदिराचे नाव डोडा गणपती मंदिर आहे. हे मंदिर बंगळुरूच्या बसवानगुडी येथे आहे. डोडा म्हणजे कन्नडमध्ये मोठा. म्हणजेच हे मंदिर म्हणजे गणपतीचे मोठे मंदिर आहे. या मंदिरात सुमारे 18 फूट उंच आणि 16 फूट रुंद गणेशाची भव्य मूर्ती आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरात एकाच काळ्या ग्रेनाईट दगडावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.
advertisement
चुकूनही बसवू नका गणपतीची अशी मूर्ती, घर-दुकानावर होतो विपरीत परिणाम
हे मंदिर कधी बांधले गेले?
गणेशाचे हे मंदिर बंगळुरूच्या नंदी मंदिराच्या मागे बांधण्यात आलंय. नंदी मंदिराबाबत असा दावा केला जातो की, जगातील सर्वात मोठी नंदी मूर्ती येथे स्थापित आहे. डोडा गणपती मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे असं देखील म्हटलं जातं. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 1537 च्या सुमारास गौर शासकांनी बांधले होते. मंदिरात तुम्हाला प्राचीन दक्षिण भारतीय वास्तुकला पाहायला मिळतील. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या रंगाची गणेशमूर्ती आहे.
लोण्याने केला जातो श्रृंगार
या मंदिराची सर्वात मोठी विचित्र गोष्ट म्हणजे येथे भगवान फुलांनी नाही तर लोणीने सजवलेले आहेत. या मंदिरात श्रीगणेशाला 100 किलो लोण्याने सुशोभित केले आहे. या सजावटीला 'बेने अलंकार' म्हणतात. एवढेच नाही तर येथील गणपतीच्या मूर्तीवर लावलेले लोणी कधीही वितळत नाही. देवाच्या मूर्तीवर लावलेले लोणी प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जाते. या मंदिरात बसून टिपू सुलतानच्या सेनापतीने इंग्रजांविरुद्ध डावपेच आखले होते, असे सांगितले जाते.