हातांवरील रेषा फिकट होणे
गरुड पुराणानुसार, जेव्हा व्यक्तीचा मृत्यू अगदी जवळ येतो, तेव्हा त्याच्या हाताच्या तळव्यांवरील रेषा हळूहळू नाहीशा होऊ लागतात किंवा अत्यंत फिकट पडतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या रेषा आपल्या आयुष्याचे आणि कर्माचे प्रतीक असतात. मृत्यूच्या वेळी प्राणांचा प्रवास शरीरातून बाहेर पडण्याच्या दिशेने सुरू होतो, ज्यामुळे हस्तरेषा अस्पष्ट दिसू लागतात.
यमदूतांचे दर्शन
advertisement
मरणासन्न व्यक्तीला आपल्या आजूबाजूला काही गडद रंगाच्या भयावह आकृत्या दिसू लागतात. हे यमदूत असल्याचे मानले जाते, जे त्या व्यक्तीचा आत्मा नेण्यासाठी आलेले असतात. असे म्हटले जाते की, यमदूत इतके जवळ दिसतात की त्या व्यक्तीला आपल्या जवळ बसलेली जिवंत माणसे दिसेनाशी होतात. अशा वेळी ती व्यक्ती खूप घाबरलेली किंवा गोंधळलेली दिसते.
स्वप्नात पूर्वजांचे दिसणे
ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आहे, तिला आपले मृत पूर्वज किंवा नातेवाईक दिसू लागतात. त्याला असा भास होतो की त्याचे पूर्वज त्याला स्वतःकडे बोलावत आहेत किंवा त्याचे स्वागत करण्यासाठी उभे आहेत. ज्यांच्या कर्माची शिदोरी चांगली असते, त्यांना आपले पूर्वज हसताना दिसतात, तर वाईट कर्म करणाऱ्यांना पूर्वजांच्या रडण्याचा किंवा क्रोधाचा अनुभव येतो.
रहस्यमयी द्वार दिसणे
प्राण सोडण्याच्या काही काळ आधी व्यक्तीला एक विचित्र दरवाजा किंवा मार्ग दिसू लागतो. काही लोकांना त्यातून तीव्र पांढरा प्रकाश येताना दिसतो, तर ज्यांनी पाप केले आहे त्यांना त्या दरवाज्यातून आगीच्या ज्वाला किंवा अंधार दिसतो. हे द्वार म्हणजे स्वर्गलोक आणि परलोकातील सीमारेषा मानली जाते.
स्वतःची सावली न दिसणे
हा सर्वात आश्चर्यकारक संकेत मानला जातो. मरणाऱ्या व्यक्तीला पाणी, तेल, तूप किंवा आरशामध्ये आपले प्रतिबिंब दिसणे बंद होते. इतकेच नाही तर सूर्यप्रकाश किंवा दिव्याच्या उजेडातही त्याला स्वतःची सावली दिसत नाही. जेव्हा सावली साथ सोडते, तेव्हा समजावे की त्या व्यक्तीचे पृथ्वीवरील आयुष्य आता अवघ्या काही मिनिटांचे उरले आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
