गृहप्रवेश पूजा का आवश्यक आहे?
वास्तुशास्त्रानुसार, कुटुंबाच्या कल्याणासाठी नवीन घरात गृहप्रवेश पूजा करणे आवश्यक आहे. गृहप्रवेश पूजेचे काही फायदे सांगितले आहेत. गृहप्रवेश मुहूर्तावर केल्याने वाईट शक्ती घरापासून दूर राहतात आणि सकारात्मक ऊर्जा येते. गृहप्रवेश विधीमुळे घरातील वातावरण पवित्र आणि आध्यात्मिक बनते. घरात राहणाऱ्यांना समृद्धी, शुभेच्छा आणि चांगले आरोग्य लाभते. गृहप्रवेश पूजा केल्याने कुटुंबावर देवी-देवतांचे आशीर्वाद राहतात.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, गृहप्रवेश करण्याचे तीन प्रकार आहेत. अपूर्व गृहप्रवेश म्हणजे पहिल्यांदाच घरात प्रवेश करणे. द्वितीय गृहप्रवेश म्हणजे व्यक्ती जुन्या खरेदी केलेल्या घरात पुन्हा प्रवेश करते. तिसरा म्हणजे पुनर्बांधणी केलेल्या घरात प्रवेश करणे.
नवीन घरात प्रवेश कसा करायचा?
- घरात प्रवेश करताना गणपतीची स्थापना आणि वास्तुपूजा अवश्य करावी.
- घरात पहिल्यांदा प्रवेश करताना उजवा पाय पुढे ठेवा. त्या रात्री घरी कुटुंबातील सर्वांनी त्याच घरात झोपावे.
- वास्तुपूजेनंतर, घरमालकाने संपूर्ण इमारतीची फेरी मारावी.
- महिलेने पाण्याने भरलेले भांडे घेऊन संपूर्ण घरात फिरावे आणि सर्वत्र फुले लावावीत.
- गृहप्रवेशाच्या दिवशी घरात पाण्याने किंवा दुधाने भरलेले भांडे ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते मंदिरात अर्पण करा.
- गृहप्रवेश करण्याच्या दिवशी घरात दूध उकळणे शुभ असते.
- घरात प्रवेश केल्यानंतर, घर 40 दिवस रिकामे ठेवू नये. त्या घरात किमान एक व्यक्ती असणे खूप महत्वाचे आहे.
खुर्चीवर बसल्या-बसल्या पाय हलवण्याची सवय अतिशय बेक्कार; इतक्या गोष्टींवर परिणाम
नवीन घरात प्रवेश करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे -
- शुभ मुहूर्तावर घरात प्रवेश केला पाहिजे.
- गृह प्रवेश करण्याच्या दिवशी, उजव्या पायाने घरात प्रवेश करावा.
- या दिवशी गणेशाची स्थापना करावी आणि वास्तुपूजा करावी.
- घरी दूध उकळणे शुभ मानले जाते.
- गृहप्रवेशादिवशी घरात मंगल कलश ठेवावा.
- या शुभ दिवशी घरी कीर्तन करणे शुभ मानले जाते.
- गृहप्रवेशाच्या दिवशी आंब्याच्या पानांपासून आणि लिंबापासून बनवलेले तोरण घराला लावावे.
- गृहप्रवेशाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- घर रांगोळी आणि फुलांनी सजवावे.
भाग्योदय जवळ आलाय! शनिअस्ताने या राशींच्या जीवनात नवी पहाट; प्रयत्न सक्सेस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)