Astrology: भाग्योदय जवळ आलाय! शनिअस्ताने या राशींच्या जीवनात नवी पहाट; प्रयत्न सक्सेस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Ast 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात महत्वाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे शनीच्या स्थितीत थोडासा बदल अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण करू शकतो. शनी हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. या काळात त्याचा उदय आणि अस्त होत राहतो. त्याचा परिणाम संपूर्ण राशीचक्रावर होतो. आता शनी लवकरच कुंभ राशीत अस्ताला जाणार आहे.
वैदिक कॅलेंडरनुसार, शनी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07:01 वाजता अस्ताला जाईल आणि 06 एप्रिलपर्यंत अस्तावस्थेत राहील. या दरम्यानच्या काळात शनी मीन राशीत प्रवेश करेल. शनिच्या अस्तामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होईल, तर अनेक राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शनि अस्तानंतर कोणत्या राशींना शुभ लाभ होऊ शकतो ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
मीन - या राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्त फायदेशीर ठरू शकतो. या राशीत, शनी बाराव्या आणि लग्न भावात असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. मानसिक ताण-तणावापासून मुक्तता मिळण्याची शक्यता देखील आहे. करिअर क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळणार आहेत. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.
advertisement
advertisement
advertisement
वृषभ - व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प किंवा मोठा करार मिळू शकेल. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पण अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)